वसंतनगर येथे राष्ट्रवादी युवक शाखेचे उद्घाटन
जळोची – बारामती शहरातील वसंतनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शाखेचे उद्घाटन युवा नेते जय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, माजी अध्यक्ष अमर धुमाळ, तालुका अध्यक्ष राहुल वाबळे, ओंकार जाधव, माजी उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, राजेंद्र बनकर, नवनाथ बल्लाळ, अभिजीत जाधव, प्रताप पागळे, सनी देवकाते,धीरज लालबिगे, अक्षय माने, विजय जाधव, सुजित जाधव,
बाळासाहेब गायकवाड, बिट्टू जाधव, संजय गायकवाड, राहुल गायकवाड, ईजाज खान, उपस्थीत होते. शाखा फलक अनावरणानंतर जय पवार यांनी पदाधिकार्यांसमवेत ओंकार जाधव यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. कुटुंबीयांसोबत गप्पागोष्टी केल्या तसेच ओंकार जाधव मित्रपरिवाराच्या माध्यमातून चाललेल्या विविध समाजोपयोगी कामांची माहिती घेतली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष : गौरव जाधव, उपाध्यक्ष : बबलू दास, कार्याध्यक्ष : शामराव जाधव, सचिव : शुभम गायकवाड, खजिनदार : अथर्व गायकवाड, सरचिटणीस : सौरभ गायकवाड, संघटक : भूषण गायकवाड, सहसंघटक : सिद्धार्थ गाडे.