टेकवडे, जगदाळे यांनी नागपूर येथे भेट घेत दिले निवेदन
सासवड – पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजना, जानाई शिरसाई योजना, खानवडी येथील महात्मा फुले यांच्या स्मारका संदर्भात सासवड जेजुरी नगरपालिका पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या संदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे व भाजपाचे पुरंदर तालुका माजी अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी भेट घेतली असून विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली
पुरंदरमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी संकटामध्ये तात्काळ पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा डेपो सुरू करणे, पुरंदर व जानाई ऊपसा सिचंन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, खानवडी येथे सास्कृंतीक विभागाकडून थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांचा अंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्य दिव्य पुतळा उभारणी करणे,
उरळी देवाची व फुरसुंगी येथील नागरिकांचा नगरपालिका/महानगरपालिका याबाबतच्या अर्धवट व न्याय प्रविष्ठ बाबींमुळे नागरिकांचे निर्माण झालेल्या विविध प्रश्न व समस्यांचा त्वरीत सोडवणूक होणे, विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणे, सासवड व जेजुरी नगरपालिका हद्दीतील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी त्वरीत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ होणे या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सरचिटणीस गणेश मेमाणे तर प्रमुख उपस्थितांमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.