अॅड. प्रियदर्शनी कोकरे : लाकडी येथे घोंगडी बैठक
बारामती – ओबीसी बहुजन समाजाने एकजुटीने काम करावे पुढच्या पिढीसाठी ओबीसी आरक्षण महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजावर अन्याय करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम येत्या काळात भोगावे लागतील. हे राज्य संविधानावर चालते, यामध्ये संविधानाने दिलेल्या हक्काला धक्का लावू नये, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. प्रियदर्शनी कोकरे यांनी केले.
लाकडी, वायसेवाडी, काझड येथे ओबीसी समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली, यावेळी 16 फेब्रुवारी पर्यंत ओबीसी समाजाने जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते,
असे अॅड. प्रियदर्शनी कोकरे यांनी नमूद केले. याप्रसंगी यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, काझडचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील, लाकडीचे दत्तात्रय वनवे, अकोले गावचे ग्रामपंचायत सदस्य बबन सोलनकर, अंकुश पडळकर, रासपचे अण्णा पाटील, संजय पांढरे, नवनाथ नरुटे, देविदास नरुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र बनकर म्हणाले की, ओबीसी भटके विमुक्त समाजाने एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारला पाहिजे. रात्र वैर्याची आहे, समाज प्रबोधन करून जागृती वाढवा असे त्यांनी नमूद केले.