निवड प्रक्रियेवेळी देवदत्त निकम गैरहजर
मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी वसंतराव भालेराव, तर उपसभापती पदी सचिन पानसरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. रोकडे यांनी मंगळवारी (दि. 23) दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या, तर एका जागी राष्ट्रवादी बंडखोर माजी सभापती देवदत्त निकम निवडून आले होते. सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया मंचर बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात पार पडली. यावेळी देवदत्त निकम हे गैरहजर राहिले होते. सभापती पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते वसंतराव भागुजी भालेराव, उपसभापतीपदी सचिन हरिभाऊ पानसरे यांनी अर्ज भरला.
दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. रोकडे यांनी केली. यावेळी संचालक शिवाजीराव ढोबळे, रामचंद्र गावडे, संदीप शेठ थोरात, नीलेश स्वामी थोरात, सोमनाथ भाऊ काळे, जे. के. थोरात, लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी, गणेश वायाळ, मयुरी भोर, रत्ना गाडे, सखाराम गभाले, संदीप चपटे आदी संचालक उपस्थित होते.
शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती वसंतराव भालेराव व उपसभापती सचिन पानसरे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख दिलीप पवळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात मंचर बाजार समितीच्या बरोबरच तळेघर, घोडेगाव, चांडोली आणि लोणी या उपबाजार समित्यांमध्ये सुधारणा करून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करून दिल्या जातील, अशी ग्वाही वसंतराव भालेराव यांनी दिली.
मंचर बाजार समिती सभापती, उपसभापती पदाची निवड ही अडीच वर्षांसाठी आहे.
विष्णूकाका हिंगे, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस