लोणी धामणी : भिर्रर्र…. झाली…. उचल की टाक…. सेकंद…. अशा भारदस्त आवाजात तापलेल्या उन्हात हजारो बैलगाडा शौकिनांनी वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीचा आनंद लूटला.
या शर्यतीमध्ये २५० बैलगाडा मालकांनी भाग घेतला होता. या शर्यती दोन दिवस चालल्या होत्या. पैकी पहिल्या दिवशी पहिल्यात पहिला सखाराम नारायण सोनवणे, दुसऱ्यात पहिला ऋत्वीक महेश आदक, तीसऱ्यात पहिला ज्ञानेश्वर किसन आळेकर,चवथ्यात पहिला संदीप परशुराम ढोबळे यांच्या बैलगाड्यांनी मान मिळविला.पहिल्या दिवशी घाटाचा राजा होण्याचा मान पोपट गोविंद आदक व गुलाब बजाबा खोमणे यांच्या बैलगाड्यांनी मिळविला.
दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या शर्यतीमध्ये पहिल्यात पहिला धोडिंबा बापू आदक, दुसऱ्यात पहिला साई किरण गावडे, तिसऱ्यात पहिला भगवान नामदेव सिनलकर,चवथ्यात पहिला उत्तम शिवराम गूळवे यांच्या बैलगाड्यांनी मान मिळविला तर दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा धोंडिबा बापू आदक व गणेश लांघे यांच्या बैलगाड्यांनी मान मिळविला.
तर दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. वीस फूटावरून कांडे यामध्ये कै.फक्कड मार्तंड शिंदे यांच्या बैलगाड्यांनी मान मिळविला. दोन दिवस पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीचे नियोजन वडगावपीर-मांदळेवाडी ग्रामस्थांनी केले होते.तर यात्रा काळात पारगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.