वाघोली : भारतीय जनता पार्टी पूर्व हवेली तालुका कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी विद्यालय, फुलगाव येथे उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घघाटन माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे 1 ले सत्र पुणे जिल्हा परिषद गटनेते मा श्री शरद बुट्टे पाटील यांचे झाले. कार्यकर्ता , पदाधिकारी , उमेदवार , निवडणूक व त्याचे नियोजन , या संबंधी त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे 2 रे सत्र महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले यांचे झाले या सत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व केंद्र शासनाची होत असलेली उल्लेखनीय कामगिरी याची त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे 3 रे सत्रामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व महाराष्ट्राची रणरागिणी चित्राताई वाघ यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थिती , महिलांचे वास्तववादी प्रश्न , भ्रष्टाचार राजकारण यावर अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे 4 थे सत्र पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांचे झाले. या सत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थापना पुर्वापासून आतापर्यंत चे पूर्ण कार्य तसेच जनसंघाचे विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे 5 वे सत्रामध्ये जिल्हा संघटन सरचिटणीस अँड धर्मेंद्रजी खांडरे यांनी 370 कलम , सी.सी.ए , एन.आर.सी. व जी.एस.टी. या कायद्याबाबत उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे शेवटचे व 6 वे सत्र किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे साहेब यांनी घेतले या सत्रामध्ये शेतकरी , कृषी कायदा , शेतमाल विषयी , शेती करार व सद्याची शेतकरी बांधवांची परिस्थिती याविषयी अतिशय छान मार्गदर्शन करून सर्वांची मने जिंकली.कार्यक्रमाची सांगता जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदासशेठ उंद्रे यांनी केली.
या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव गणेशजी कुटे , जिल्हा सरचिटणिस सुदर्शन चौधरी , जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव , प्रविण काळभोर , सुनिल कांचन , जिल्हा पदाधिकारी विकास जगताप, श्रीकांत कांचन, पुनमताई कांचन , सारीकाताई कांचन, अजिंक्य कांचन, संदीप सातव, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष अमोल शिवले , सुप्रियाताई गोते, युवा अध्यक्ष अनिल सातव व हवेली तालुक्यातील सर्व मोर्चा , आघाडीचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन हवेली भाजपा चे अध्यक्ष पै. संदीप आप्पा भोंडवे , कार्याध्यक्ष शामराव गावडे , सरचिटणिस गणेश चौधरी , श्री विजय जाचक व हवेली तालुका कार्यकारणी यांनी केले . यावेळी पंचायत समिती हवेली सदस्य श्याम गावडे यांची हवेली तालुका भाजपच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते श्याम गावडे यांना देण्यात आले.