जेजुरी – होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेत वाफगाव येथे होणाऱ्या सहा जानेवारीच्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात केली.
यावेळी त्यांच्यासमवेत ॲड. गोविंद देवकाते, बापू सोलनकर, रमेश लेंडे, ॲड. प्रियदर्शनी कोकरे, जालिंदर खोमणे, प्रतिक मोरे, राजेंद्र बरकडे, महादेव वाघमोडे, अभिमन्यू उघडे, सुरेश महानवर, देवेंद्र बनकर, लक्ष्मण घोळवे, राजेश कांबळे, निरंजन जवारे आदी मान्यवर उपस्थित होते. देवदर्शन झाल्यावर भूषणसिंह यांनी गडावर असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरात वाफगाव येथे होणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त चर्चा करण्यात आली. राज्यभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहे. आपण देखील बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.