शिक्रापूर – एक जानेवारी या २०६ व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभ या ठिकाणी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रम प्रसंगी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत ऐतिहासिक विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व जिल्हा उपाध्यक्ष दिपिका भालेराव यांनी दिली आहे.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ स्तंभ या ठिकाणी शौर्यदिनी विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आलेली असताना, प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आलेली असताना लष्कर ए भीमा संघटना अध्यक्ष सचिन धिवार, पुणे शहराध्यक्ष छाया कांबळे, राजे प्रतिष्ठान अध्यक्ष मिलिद गायकवाड, बाबा नागटिळे, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व जिल्हा उपाध्यक्ष दिपिका भालेराव, दादाभाऊ बारभुवन, साधना मिसाळ, विवेक चव्हाण, निलेश आल्हाट आदींनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे प्रशासनाची चर्चा करीत ऐतिहासिक विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली.
काही अटी शर्थीवर ऐतिहासिक विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याची परवानगी देण्यात आल्याने समाज बांधव समाधान व्यक्त होत आहे. यावेळी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत ऐतिहासिक विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.