आढळराव पाटील ः जुन्नरमधील महारॅलीत पदाधिकार्यांसह नागरिकांची गर्दी
जुन्नर – किल्ले, निसर्गसंपदेची विपुलता पाहता भीमाशंकर ते खिरेश्वर पर्यटन सर्किटचा महत्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लावायचा आहे, हे स्वप्न साकार करण्याची संधी मला द्या, असे आवाहन महायुतीचे शिरूर लोकसीेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
शिरुर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या जुन्नर शहरातून निघालेल्या महारॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला.
सांगता शंकरपुरा पेठेतील सभेने झाली. या सभेत आढळराव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडूरंग पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सूर्यकांत ढोले. भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे, मनसेचे साईनाथ ढमढेरे, भाऊ देवाडे, दिलीप गांजाळे, सुनीता बोर्हाडे, दत्ता गवारी, विजय राक्षे, अमोल लांडे, सचिन चव्हाण, सुरेश तिकोणे, बबनराव तांबे, अनिल रावते, किसन अंभेरे, मंगेश गायकवाड व इतर महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी व नेत्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली होती.
महायुतीतील नेते म्हणतात…
अतुल बेनके ः शिवाजीराव आढळराव हा कामाचा माणूस आहे. त्यांना निवडून देणेच हिताचे आहे.
शरद सोनवणे ः सुखदुखात सोबत राहणारे आढळराव हेच मतदारसंघासाठी योग्य उमेदवार असून विकासकरण्याची धमक त्यांच्यात आहे.
संजय काळे ः 500 वर्षे बंदिवासात असलेल्या रामाला मुक्त करुन, त्याचे भव्य मंदिर बांधणार्या नरेंद्र मोदींनी भारताची अस्मिता जपली आहे. शेकडो कोटींचा निधी आढळराव यांनी मतदारसंघात खासदार नसतानाही आणला आहे. तेच विकास करु शकतात.
आशाताई बुचके ः तुम्ही मतदारांना वेडे समजू नका, तुमचा बुरखा फाडल्याशिवाय शिरुरची जनता स्वस्थ बसणार नाही.
देवराम लांडे ः खासदार नसतानाही आदीवासी भागात निधी आणण्याचे काम आढळरावांनी केले आहे. त्यामुळे निश्चितपणे आदीवासी समाज आढळराव यांच्यासोबत आहे.
साऊथचे अभिनेते आकर्षण..
साऊथचे अभिनेते रवी काळे यांची उपस्थिती जुन्नरमधील आढळरावांच्या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले होते. त्यापूर्वी कुकडी नदीच्या उगमस्थळी असलेले आदीवासींचे आराध्य दैवत कुकडेश्वरचे दर्शन घेऊन या दौर्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर निरगुडे येथे झालेल्या मेळाव्याला देखील प्रचंड मोठी झाली होती. जुन्नरचे आराध्य ग्रामदैवत सिद्धिविनायकाच्या दर्शनाने जुन्नर रॅलीचा प्रारंभ झाला.