श्री सिद्धेश्वर, माता जोगेश्वरीच्या चरणी भाविक लीन
नायगाव – पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नायगाव येथे माघ पौर्णिमेनिमित्त भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. माघ पौर्णिमेनिमित्त पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कर्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले व अभिषेक करण्यात आला.
सतीश महाराज काळजे (देवाची आळंदी) यांच्या किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. त्यांना गायन साथ प्रकाश कांबळे महाराज,राऊत महाराज यांनी दिली.मृदुंग साथ तेजस खेसे महाराज यांनी दिली. भजन साथ नायगाव भजनी मंडळाने दिली. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापूजा पुजारी पार्थ जगताप यांनी केली.
यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब कामथे यांची निवड झाल्याबद्दल डॉ. काजल चौंडकर यांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केल्याबद्दल ऐश्वर्या लक्ष्मण खेसे हिने इलेक्ट्रिक इंजिनिअरमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल तसेच सचिन शिवले,
नवनाथ वाळके यांच्या सत्कार करण्यात आला. मंदिर परिसराची स्वच्छता, लाइट, पाणी, दर्शनबारी आदिंची उत्तम व्यवस्था केली होती असे राहुल कड यांनी सांगितले.