शिक्रापूर : कासारी (ता. शिरुर) येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे माध्यमातून शासनाच्या योजनेंची माहिती देत आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे.
कासारी येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे सरपंच सुनीता भुजबळ यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच गणपतराव काळकुटे, ग्रामविकास अधिकारी वसंत पवार, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारी सदस्य नवनाथ भुजबळ, भाजपा उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष अरविंद काळकुटे,
भाजपा ओबीसी चिटणीस प्रकाश टिळेकर, महिला मोर्चाचे चिटणीस भाग्यश्री गायकवाड, लोकसभा संयोजिका अनघा पाठक, किसान आघाडीचे शिरूर तालुकाध्यक्ष अनिल नवले, चक्रधर भुजबळ, धनंजय नेवसे, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनेबद्दल चित्रफितेद्वारे ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांना कार्ड वाटण्यात आले.
सूत्रसंचालन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारी सदस्य नवनाथ भुजबळ यांनी केले. ग्रामविकास अधिकारी वसंत पवार यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच गणपतराव काळकुटे यांनी आभार मानले.