वडूज – राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कातरखटावचे निष्ठावंत कार्यकर्ता मकरंद बोडके यांची निवड करण्यात आली आहे. रयत आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक असलेल्या मकरंद बोडके यांनी कातरखटाव परिसर आणि खटाव तालुक्यात शाळा दुरुस्ती-साठी मदत, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व सायकल वाटप, इमारत दुरुस्तीसाठी मदत, वृक्षारोपण, अशी सामाजिक कामे केली आहेत. शरद पवार यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार खेड्यापाड्यात पोहोचवण्याचे कामही त्यांनी केले आहे.
याच कामाची पोचपावती म्हणून आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, खटाव-माणचे नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी बोडके यांची निवड केली.
आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर देशमुख, मेहबूब शेख, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद बागल, प्रदेश सरचिटणीस अभय जगताप, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, खटाव तालुका कार्यकारी अध्यक्ष महेश माने, वडूजचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार यांच्या उपस्थितीत बोकडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.