रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचा गौरव
रांजणगाव गणपती – वेशांतर करुन आरोपीला अटक करण्याच्या घटना सिनेमामध्ये पाहत असतो. असेच वेषांतर प्रत्यक्ष करुन आरोपीला अटक करण्याचे काम रांजणगाव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाचा खून करुन आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. हा आरोपी खून केल्यानंतर मिळेल तेथे मजूर अड्ड्यांवर काम करीत होता. तो मोबाइल वापरत नसल्याने आरोपीचा शोध घेण्याचे रांजणगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
त्यावेळी कॉन्स्टेबल कुतवळ यांनी वेषांतर करीत हडपसर येथील मजूर अड्डयावर मजूर म्हणून काम करुन शिताफिने आरोपीस अटक केली. त्यांच्या कामगिरीबद्दल रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण आणि उमेश कुतवळ यांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कामगिरीबद्दल रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.