आमदार मोहिते यांचे पुतणे शैलेश मोहितेंचा ठकरे गटात प्रवेश
शेलपिंपळगाव – लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
शैलेश मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. शैलेश हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत.
तसेच राष्ट्रवादीचे ते उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीपचे निरीक्षक होते. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने शिरूर लोकसभेत ठाकरे गटाचे बळ वाढले आहे.
यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरेंना ही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचले होते. मावळ लोकसभेत वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्के दिले आहेत.