नगर – नगर सीना नदीपात्राच्या ह्वनिश्वितीच्या कामास वेग आलेला असतानाच मध्यंतरी झालेल्या पावसामुळे या कासीत अडथळा आला. नागापूरपासून ते भूतकरवाडी पंपिंग स्टेशनपर्यंत हद्दनिश्चिती आणि खांब उभे करण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मोजणी पथकाकडून मिळाली आहे.
सीना नदीपात्राची मोजणी हदनिधिती करण्याच्या कामास डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली होती. नागापूर येथून सदरचे काम सुरू करण्यात आले होते. महापालिकेचा नगररचना विभाग, अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचारी या मोजणी कामात सहभागी झालेले आहे. नागापूरपासून ते भूतकरवाडी पंपिंग स्टेशनपर्यंत नदीपात्राची मोजणी करून हद्दनिश्चितीच्या खुणा तसेच या खुणांच्या जागी खांब उभे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तथापि मध्यंतरी शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी परिसरात सर्वत्र चिखल झाला. परिणामी मोजणी आणि खुणा करण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे मागील आठवडाभरापासून सदरचे काम थांबविण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात हद्दनिश्चितीच्या ठिकाणी लावण्यात आलेले खांब स्पष्ट दिसावेत यासाठी या खांबाभोवती तसेच दोन खांबांमध्ये असलेली झाडेझुडपे हटविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मशीनच्या सहाय्याने झाडेझुडपे हटविण्याचे काम सध्याही सुरू असून, खांबांची संपूर्ण लाईन दिसण्याबरोबरच पांढरी फक्ती (चुना) टाकण्याचे कामही सोयीस्कर होणार आहे.
हद्दनिश्चितीच्या वेळी काही शेतकऱ्यांनी हरकती घेतल्याचे सांगण्यात आले. तथापि आयुक्तांकडे त्याबाबत लेखी देणे महत्त्वाचे असून जे शेतकरी लेखी स्वरूपात हरकती नोंदवतील त्यावर सुनावणी होऊन निर्णय घेतला जाणार आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांनी मोजणी पथकासमोर येऊन हरकत घेतली तेथे पथकाने खांब उभे करण्याचे टाळले असून, हरकतीवरील निर्णयानंतर ते खांब उभे केले जाणार असल्याचे सांगण्यान आले आहे. दरम्यान आठवडाभरापासू बंद असलेले काम सोमवार (दि. २२ पासून पुन्हा जोमाने सुरू करण्या येणार असल्याची माहिती या पथकात अधिकाऱ्यांनी दिली आहे.