यमुनानगर, निगडीसह विविध ठिकाणी भेटी
भोसरी : भोसरी विधानसभा क्षेत्रातल्या महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रभागभेट दौऱ्याला नागरिकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. विविध प्रभागाचे नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, भाजपसह महायुतीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दौऱ्यात सहभाग होता.
आढळराव पाटील हे आमच्यातला माणूस म्हणून आमच्या समस्या समजून घेत त्या मार्गी लावणे, अडीअडचणी दूर करणे यासाठी आमच्यासाठी कायमच उपलब्ध होणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठीशी आम्ही भक्कमपणे राहू, असा निर्धार अनेकांकडून व्यक्त झाला.
चिंचवड स्टेशन येथील शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक दिवंगत आण्णासाहेब जाधव यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आढळऱाव यांनी अभिवादन केले. संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, मुख्याध्यापक बालाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, संचालक विजय जाधव, अपूर्व आढळराव पाटील उपस्थित होते.
यमुनानगर निगडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष प्रसाद कोलते यांच्या निवासस्थानी आढळराव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक पंकज भालेकर, युवा उद्योजक विवेक कोलते, सामाजिक कार्यकर्ते शामाकांत नांगरे, सागर राजणे, प्रिया कोलते, सुरेखा फड, रुपाली फड, रुपाली कोठावळे, सायलीताई आवटे, सदाशिव सावळे, गजानन पवळे यांनी आढळराव यांची भेट घेतली.
निगडी सेक्टर २२ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय भेटीत नागरिकांचा उत्साह होता. यावेळी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भोसरी विधानसभा शिवसेना समन्वयक विशाल लांडगे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष कविताताई अल्हाट आदी उपस्थित होते. दरम्यान नगरसेविका कमलताई घोलप यांच्या जनसंपर्क कार्यालय येथेही सदिच्छा भेट आढळराव यांनी दिली.
यावेळी युवानेते बापुशेठ घोलप, रवी पाटोळे, सीमा भालेकर, अरुण कांबळे , नजमा शेख, कृष्णा घोलप, सारिका जाधव, नागेश भिसे, शिल्पा शिंगारे, किशोर लांडगे, किरण गंडले, संतोष नाटेकर, सचिन गायकवाड, पूजा कसबे, नयन पटावे, बालू पलगुंबे आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अष्टविनायक उद्यान येथील सदिच्छा भेटीत हर्षद खळदकर, दीपाली खळदकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. भाजपा युवा मोर्चाचे गिरिश देशमुख, जगदीश साबळे, विलास उमराणी, सचिन गवळी, संतोष सोनवणे उपस्थित होते.
यावेळी शेखबाबा चँरिटेबल ट्रस्ट अखिल भारतीय कौमी एकता पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आलम उर्फ बाबा शेख, पिंपरी चिंचवड शहर सुधारणा समितीच्या सभापती शुभांगी बोऱ्हाडे यांच्या कार्यालयाला आढळऱाव यांनी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गव्हाणे, भाजपचे विजूशेठ फुगे, उद्योजक संजय बोराडे, माजी नगरसेवक जीतू पवार, सामाजिक कार्यकर्ता संजय ससाणे, शिवसेना युवा कार्यकर्ते अरूण जोगदल, वॉर्ड अध्यक्ष शिवाजी शेलार, संतोष आडसूळ, कार्याध्यक्ष संजय कांबळे, राहूल येवले, बाळासाहेब भोर उपस्थित होते.
तळवडे येथील भेटीवेळी प्रभु श्रीराम मंदिर यांच्या साकार होत असलेल्या मंदिरास आढळराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना प्रभू श्रीराम यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले.