नगर पालिकेकडून प्लॅस्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी
जुन्नर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेनुसार एकल वापर (सिंगल यूज) प्लॅस्टिक व 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर जुन्नर नगर पालिकेने ही कारवाई केली आहे. कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत बाजार पेठेत फिरून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे आरोग्य निरीक्षक प्रशांत खत्री यांनी सांगितले.
प्लॅस्टिक बंदीच्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जागेवर पाचशे रुपये दंड, तसेच संस्थात्मक पातळीवर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा वापर केल्यास दहा हजार रुपये दंड, तर तिसऱ्यांदा वापर करताना निदर्शनास आल्यास 25 हजार रुपये दंड व तीन महिन्यांचा कारावास, अशी शिक्षा होऊ शकते.
आरोग्य विभागाने अशा प्लॅस्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे पाहणी वनियंत्रण पथक निर्माण केले आहे. जप्त केलेले सर्व प्लॅस्टिक हे वापरास निरोपयोगी करून रिसायकल करण्यासाठी प्रीसाईज टेकक्नॉलॉजिज, सुपा (जि. अहमदनगर) येथे पाठविण्यात येत आहे.
जुन्नर शहरात सदरील प्लॅस्टिक बंदी बाबत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून दुकानदार व नागरिकांवर कडक कारवाई करन्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी सांगितले. केंद्रीय पर्यावरण, वने व नियम 2021 नुसार सजावटीसाठी प्लॅस्टिकचा वापर हवामान बदल मंत्रालयाने प्लॅस्टिक व थर्माकोल याशिवाय मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, एकल वापर प्लॅस्टिकची आवरणे, प्लॅस्टिकच्या कॅंडी काड्या, आईस्क्रीम कांड्या, प्लेट, कप, ग्लास, कटलरी काटेचमचे, चाकू, स्ट्रॉ, ढवळण्या यांसह 100 मायक्रोनपेक्षा कमी जाडीचे पिव्हिसी बॅनर्स यावर बंदी आहे.
बंदी असलेल्या गोष्टींचा वापर, विक्री करू नये
महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 अंतर्गत कंपोस्टेबल प्लॅस्टिक (कचरा व नर्सरीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, हॅन्डल असलेल्या व नसलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, डिश, बाऊल, कंटेनर इत्यादी गोष्टींवर देखील बंदी असल्याने नागरीकांनी व दुकानदारानी बंदी असलेल्या गोष्टींचा वापर व विक्री करू नये, असे नगर परीषद प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.