मी सेवेकरी सोशल फाउंडेशनाचा मोफत उपक्रम
राजगुरूनगर – खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आंबोली येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा 1957 नागरिकांनी लाभ घेतला.
मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग व पुणे जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिरचे उद्घाटन फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांच्या हस्ते झाले. यावेळी यावेळी माजी आमदार विलास लांडे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष (पवार गट) हिरामण सातकर, बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, आंबोलीच्या सरपंच तृप्ती शिंदे, चासचे सरपंच अमोल टोके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल लोखंडे,
चिंबळीचे माजी सरपंच शंकर जैद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ इंदिरा पारखे, आरोग्य अधिकारी डॉ. पूनम चिखलीकर, डॉ. प्रीती पवार,सुदाम शिंदे, विजय खंडागळे, सुधीर शिंदे, प्रवीण वायकर, कैलास शिंदे, कचरू शिंदे, संजय कोकणे, सुनील काळोखे, विठ्ठल राजगुराव, अक्षय शिंदे, अमोल शिंदे यांच्यासह आंबोली परिसरातील गावातील नागरिक उपस्थित होते.
या सर्वरोग निदान आरोग्य महाशिबिरात लोकमान्य हॉस्पिटल, पावन हॉस्पिटल, राजमाता जिजाऊ हॉस्पिटल. हिंद लॅब, अग्रवाल डोळ्यांचे रुग्णालय, एच व्ही देसाई नेत्र रुंगालाय, आदी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. या शिबिरात नेत्र तपासणी रक्त लघवी तपासणी, ईसीजी, रक्तदाब तपासणी मधुमेह, त्वचा रोग, स्रिरोग निदान, पंचकर्म कां नाक घसा व मूत्ररोग तपासणी हाडांचे विकार आदी तपासण्या करून रुग्णांवर उपचार करण्यात आले.