पुणे – शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद घरांचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १ लाख ६४ हजारांचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातंर्गत बंद घरांची दिवसा घरफोडी करणारा अल्पवयीन चोरटा कात्रज भाजी मंडईत फिरत असल्याची माहिती पोलीस अमंलदार राहूल तांबे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पोलिसांना सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३० हजारांची रोकड सापडल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याशिवाय १ लाख ६४ हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, योगेश सुळ, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, नवनाथ खताळ यांनी केली.