पुणे – खूनाचा प्रयत्नाच्या गुन्हयातील फरार आरोपीस पिस्तूल व काडतूसासह अटक करण्यात आली. त्याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. देवलेष सूर्यकांत सांळूखे (वय 23 वर्ष रा.मु. संत रोहिदासनगर गणपणती मंदिर पाठिमागे ता.हवेली जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस स्टेशन हद्दीत फरार आरोपीचा शोध घेण्यात येत होता. यावेळी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी देवलेश साळुंके हा धरण चौक खडकवासला येथे आला असून त्याचे कमरेला पिस्टलसारखे हत्यार खोचले असल्याची खबर मिळाली होती.
त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला गावठी पिस्टल व पॅन्ट उजव्या खिशात जिवंत काडतुस मिळून आले. आरोपीकडून एकुण 35 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.