नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 38 हजार 792 नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोविड रुग्णांची संख्या आता 3 कोटी 9 लाख 46 हजार 74 इतकी झाली आहे. दरम्यान देशातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या 4 लाख 29 हजार 946 इतकी खाली आली आहे. हे प्रमाण एकूण रूग्णांच्या तुलनेत 1.39 टक्के इतके झाले आहे.
याच कालावधीत देशाचा रिकव्हरी रेट 97.28 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत एकूण 624 रुग्ण दगावले असून त्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 4 लाख 11 हजार 408 इतका झाला आहे. कालची संख्या लक्षात घेता देशातील कोविड लसीकरण झालेल्यांची संख्या आता 38 कोटी 76 लाख इतकी झाली आहे.