पुणे,दि.28- प्लॉट विक्रीच्या व्यवहारात एकाची फसवणूक केल्याप्रकरणी एस.आर.ग्रुपच्या मालकांवर गुन्हा सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप गायकवाड (70,रा.औंध) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार देवेंद्र सोमनाथ राठोड(रा.सिंहगह रस्ता) व विनोद सोमनाथ राठोड (रा.नगर रोड) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी राठोड यांनी बंगलो प्लॉट डेव्हलप करत असल्याची जाहिरात केली होती. त्यांच्याशी दिलीप गायकवाड यांनी संपर्क साधल्यावर गायकवाड यांना हवेली तालूक्यातील अर्वीमध्ये प्लॉट दाखवण्यात आला. यानंतर त्यांचा विश्वास संपादन करुन 11 गुठ्यांचा प्लॉट 14 लाखाला देतो असे सांगण्यात आले. यानंतर आगाऊ रक्कम म्हणून साडेचार लाख रुपये धनादेशाव्दारे स्विकारण्यात आले.
रजिस्टर नोटरी करारनामा करुन व्यवहार वेळेत पुर्ण करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्लॉट न देता त्यांनी घेतलेल्या पैशापैकी दोन लाख परत दिले. उर्वरीत अडीच लाख रुपये व त्यावरील व्याज त्यांना परत देण्यात आले नाही. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमरे तपास करत आहेत.