पुणे,दि.28 – लोहगाव येथे एका महिलेचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. तीचा मृतदेह डी वाय पाटील महाविद्यालयाजवळील कुबेर पार्क समोर सापडला. महिलेची ओळख पटली असून तीचे नाव अनिता संजय जाधव (28,रा.लोहगाव) असे आहे. ती मजुरी काम करते, दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती. तीच्या घरचे तीचा शोध घेत होते.
पोलिसांना मंगळवारी सकाळी मिळालेल्या माहितीनूसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. तसेच तीची ओळख पटू नये म्हणून चेहरा छिन्नविच्छीन्न करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना तीच्या हातावर एसए असे गोंदलेले आढळले. दरम्यान तीची ओळख पटली असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.