Pune Crime | रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा काळा बाजार करणारा ‘जेरबंद’

पुणे – पुणे शहरात रेमडेसिव्हरचा काळाबाजार करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले आहे. त्याने रेमडेसिव्हरचे इंजेक्‍शन त्याची नर्स असलेल्या मैत्रिणीकडून घेतले होते. हे इंजेक्‍शन तो चढ्या भावाने विकण्याच्या तयारीत होता. पृथ्वीराज संदीप मुळीक (22,रा.साईप्रसाद सोसायटी, दत्तनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस अंमलदार निलेश शिवतरे, धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, अतुल मेंगे, मॅगी जाधव, गणेश ढगे, सुमित ताकपेरे, श्रीकांत तगडे,ऋषीकेश कोळप व चेतन होळकर यांचे पथकाने ही कारवाई केली. पोलीस नाईक गणेश ढगे यांना याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून बनावट ग्राहकाच्या मदतीने इंजेक्‍शन खरेदी करण्याचा बहाणा करण्यात आला.

आरोपी मुळीक इंजेक्‍शन विकण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला असता, याला अटक करण्यात आली. इंजेक्‍शनचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली असून दहा पथके तयार करण्यात आली आहेत. काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस करत आहेत. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक आतिश सरकाळे, विवेक खेडकर, निलेश खोसे यांनी सहकार्य केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.