पुणे :- अवैधरित्या जवळ पिस्तूल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी लक्ष्मीनगर भागातून अटक केली. आरोपीकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
साहिल हनिफ पटेल (२१, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पटेल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पर्वती पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान शाहु वसाहत, लक्ष्मीनगर भागात एकजण संशयास्पदरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला यांना मिळाली.
त्यानूसार पथकाने सापळा रचून पटेल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. त्यानूसार पोलिसांनी पटेल याला अटक केली. पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कामगिरी केली.