Pune Crime | दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत कपडे फाडले

पुणे,दि.30- दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत तीचे कपडे फाडून विनयभंग करण्यात आला. ही घटना केशवनगर येथील मुंढवा पुणे सोसायटीजवळ गुरुवारी पहाटे घडली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी महिला पहाटे पावणे चारच्या सुमारास कामावरुन घरी परतत होती. यावेळी एका व्यक्तीने तीचा कुंभारवाडे ते गोदरेज इंन्फीनिटीपर्यंत पाठलाग केला. आरोपी पाठलाग करत असल्याने फिर्यादी घाबरल्या होत्या.

यामुळे त्यांची गाडी राहत्या सोसायटीजवळील स्पीड ब्रेकरजवळ घसरली. त्या खाली पडताच आरोपीने जबरदस्तीने त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.