वाघोली : जिल्हापरिषद पुणे महिला बालकल्याण व समाजकल्याण आयुक्तालयाकडून यांचेकडून हवेली पंचायत समिती सदस्य श्याम गावडे यांच्या प्रयत्नातून शिरसवडी (ता.हवेली) येथे महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या बेबी किट वाटप करण्यात आले. शिरसवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा गावडे यांच्या हस्ते महिलांना बेबी किट चे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा चटपटीत खाद्यपदार्थ खाण्याकडे कल असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. जिल्हापरिषद महिला बालकल्याण व आयुक्तालयाच्या वतीने लहान मुलांना व गरोदर मातांना सकस आहार मिळावा यासाठी बाळंत विडा/ पोषण वडी बेबी केअर कीट/ पूर्व प्राथमिक संचचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिरसवडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव गावडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश गावडे, माजी उपसरपंच बाळासाहेब गावडे, अशोक सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे, राहुल गावडे सुनील गावडे, संदीप गावडे, गणेश गावडे, संगीता गावडे, सुनंदा गावडे, शेवंता गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.