पुणे,दि.30- घरात घुसून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. यानंतर अत्याचाराचा व्हिडीओ बनवून त्याव्दारे वारंवार शरीरसंबंधाची मागणी करण्यात आली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी अण्णा उर्फ सुहास शिंदे(24) या तरुणावर बलात्कार व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पाषाण येथे रहाणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनूसार आरोपीने तीला रस्त्याने जात असताना धमकावून जबरदस्तीने बावधान येथील टेकडीवर नेले. तेथे तीला मला तुझ्यासोबत एकदा तरी सेक्स करायचे असे म्हणत विनयभंग केला. यानंतर मार्च 2019 मध्ये पिडीत मुलीचे आई वडिल वॉकिंगसाठी बाहेर गेल्याचे बघुन आरोपी तीच्या घरात घुसला. जबरदस्तीने तीच्यावर शारीरीक अत्याचार केले.
याचा त्याने लपून व्हिडिओही बनवला. यानंतर पिडीतेला तुला दररोज माझ्यासोबत सेक्स करावे लागेल नाहीतर हा व्हिडिओ तुझ्या आईला दाखवेल अशी धमकी दिली. यासंदर्भात त्याने पिडीत मुलीच्या मित्राला धमकी देऊन तु आमच्या दोघांच्यामध्ये पडायचे नाही असे सांगितले. व्हिडिओचा स्क्रिनशॉट इंन्स्ट्राग्रामवर पाठवून तीला वारंवार त्रास दिला जात आहे. हा प्रकार सन 2017 पासून सुरु होता.