पुणे – खिशातील चाकू हातात घेउन फिरणाऱ्याला विचारपूस केल्याचा राग आल्यामुळे त्याने दोघा तरूणांवर वार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवणेतील सरडे बागेजवळ घडली. याप्रकरणी भूषण विलास कांडेलकर (वय ३१, रा. शिवणे) याला अटक करण्यात आली आहे. स्वराज राजेंद्र भोसले आणि समीर ढमाले अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास स्वराज आणि मित्र समीर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे भूषण हातात चाकू फिरवत आला होता. स्वराजने भूषणला चाकूमुळे लहान मूले घाबरतील असे बजावले. त्याचा राग आल्यामुळे भूषणने स्वराजला मारहाण करून डाव्या कानावर चाकूने वार केला. त्यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणया समीर ढमाले याच्याही हनुवटीवर भूषणने वार करून जखमी केले. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस तपास करीत आहेत.