पुणे – पैशाचा हिशोब पुर्ण कर आणि मग गाडी घेऊन जा म्हणत स्कॉर्पिओ कार व 20 हजार रूपयांचे डिझेल जबरदस्तीने घेऊन जाणार्या दोघांसह त्यांच्या साथीदारांवर जबरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश कारंडे (35), राजेंद्र लांडगे (32) आणि त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पांडुरंग ब्रम्हदेव खटके (28, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे धायरी येथील रायकर मळा येथे जेसीबी व पोलॅन करिता डिझेल घेऊन गेले होते. त्यांच्या तोंड ओळखीचे आरोपी फिर्यादी यांना म्हणाले तुझे मालक कुठे आहेत, तेव्हा त्यांनी ते घरी आहे से सांगितले असता त्यांनी खटके यांची कॉलर पकडत त्यांना शिवीगाळ केली.
दरम्यान, तुझ्या मालकाला सांग योगेश कारंडे तुझी गाडी घेऊन गेला. पैशाचा हिशोब पुर्ण कर आणि गाडी घेऊन जा म्हणत आरोपी स्कॉर्पीओ कार आणि 20 हजारांचे डिझेल चोरी करून घेऊन गेले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.