पुणे – भागिदारीतील मोबदला न दिल्याचा जाब विचारल्याने मित्रास भेटावयास बोलावून त्याचा चाकूने गळा चिरण्यात आला. मात्र संबंधीत मित्र बालंबाल बचावला असून आरोपीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हडपसर येथील एम कॉलेजच्या रस्त्यावर घडली.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सचिन दिलीप होले(34,रा.ससाणेनगर, हडपसर) यास ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी शादाब शेख (36 रा.महंमदवाडी) हा आरोपी होलेचा मित्र आहे. होलेने त्यास जेएनपीटी कस्टम येथून माल घेऊन त्यात जो काही फायदा होईल तो वाटून घेऊ असे सांगितले होते. त्याप्रमाणे शेख व त्याच्या मित्रांनी होलेकडे 29 लाख 90 हजार रुपये गुंतवले होते. मात्र व्यवसाय सुरु केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नाही.
शेखने मोबदल्यासंदर्भास होलेला विचारणा केल्यावर मेसेजकरुन सय्यदनगर येथील रेल्वेगेटजवळ पैसे घेण्यासाठी बोलवण्यात आले. यानंतर रविदर्शन येथे नेऊन गळ्यावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर करत आहेत.