पुणे – कोर्स पुर्ण करुनही काम न मिळाल्याने शिवाजीनगर येथील एका फिल्म अकॅडमीच्या संचालिकेला फरफटत नेऊन मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांच्या कार्यालयाची तोडफोडी केली गेली. संतप्त विद्यार्थी, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि एका माजी कर्मचाऱ्याने हे कृत्य केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी 30 वर्षीय महिलेची फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर फिल्म अकॅडमी ऑफ मिडिया एक्सिलंन्स नावाची संस्था आहे. येथे विद्यार्थ्यांना अभिनय व इतर प्रशिक्षण दिले जाते. यासंस्थेत प्रशांत काटकर (27) हा काम करत होता. त्याला काही दिवसांपुर्वीच कामावरुन काढूण टाकण्यात आले होते. तर फिर्यादीकडे विद्यार्थी म्हणून असलेल्या तीन तरुणी आणि एका तरुणाला अद्यापपर्यंत कोणतेही काम मिळाले नव्हते.
याचा राग मनात धरुन सर्वजण 27 मार्च रोजी अकॅडमीच्या कार्यालयात बेकायदा घुसले. यानंतर कार्यालयातील काचेची फ्रेम, फ्लेक्स, रस्त्त्यावरील जाहिरातेचे फ्लेक्स यांचे 20 हजाराचे नुकसान केले. यानंतर फिर्यादीचे केस ओढून, हाताने मारहाण करुन फरफटत नेऊन जखमी केले. यामध्ये त्यांची तीन तोळ्याचे चेन गहाळ झाली. या प्रकाराचे व्हिडिओ चित्रकरण केले गेले. तसेच ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.