पुणे – दुचाकी चोरणाऱ्या वायरमनला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी जप्त केल्या आहेत.
कुणाल सुरेश बधे (वय-२९, रा. रांजणे ता. वेल्हा, जि. पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अमृत खान, लिपाने वस्ती येथे एक जण चोरीची दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे यांना बातमीदार मार्फत मिळाली होती. कुणाल बधे याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने भारती विद्यापिठ, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून ३ लाखांच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर इतर दोन दुचाकीची माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस सह आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, सचिन सरपाले, चेतन गोरे, शैलेश साठे यांच्या पथकाने केली.