पुणे,दि.25- एटीएम मशीनमध्ये छेडछाड करत तब्बल पाच लाखाची रोकड चोरण्यात आली. ही घटना कॅनरा बॅंकेच्या फर्ग्युसन महाविद्यालयाजवळील एटीएममध्ये घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक महिला व एका पुरुषाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कॅनरा बॅंकेच्या एटीएममध्ये एक पुुरुष महिलेसह सॅक घेऊन आला होता. त्याने सॅक एटीएम मशीनच्या मागे ठेऊन मशिनमध्ये तांत्रीक छेडछाड केली. यानंतर पाच ट्रांन्सजॅक्शन करुन एक लाख रुपये काढून घेतले.
दरम्यान एक ग्राहक पैसे काढण्यासाठी आल्याने तो बाहेर आला. ग्राहक पैसे काढून निघुन गेल्यावर महिला साथीदार एटीएममध्ये गेली. तीने 20 ट्रांन्सजॅक्शन करुन तब्बल चार लाख रुपये काढून घेतले. एटीएममधील पैसे संपल्यावर दोघेही मशिनमागील ठेवलेली सॅक घेऊन निघुन गेले. कॅनरा बॅंकेच्या इतरही तीन ते चार एटीएम मशीनमध्ये असाच प्रकार घडला आहे.
कॅनरा बॅंकेच्या स्थानिक शाखेला त्यांच्या हेड ब्रॅंचने असा प्रकारे पैसे काढले गेल्याची खबर दिली होती. त्यानंतर बॅंकेने पडताळणी करुन फिर्याद दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गौड करत आहेत.
मशिन हॅक केल्यावर आरोपींनी एक हजाराचे ट्रांन्सजॅक्शन केल्यावर दह हजार निघत होते. या प्रकारे त्यांनी एक एक हजाराचे 25 ट्रांन्सजॅक्शन करुन 5 लाख रुपये काढले आहेत.