विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत महिलांच्या ‘फिगर’बाबत वादग्रस्त विधान; व्हिडीओ व्हायरल

कोइम्बतूर – देशातील तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम या चार राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे राष्ट्रीय पक्षांसह स्थानिक पक्षांच्या नेतेमंडळींनी निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावलाय. प्रचारादरम्यान वादग्रस्त, आक्षेपार्ह्य विधानं, टोकाची वैयक्तिक टीकाटिपणी याला या निवडणुका देखील अपवाद राहिल्या नसून नेतेमंडळी एकमेकांवर स्वैर टीका करताना दिसतायेत. अशातच आज द्रमुकचे नेते दिंडिगल लिओनी यांच्या एका वादग्रस्त विधानाने माध्यमांचे लक्ष वेधून घेतलंय.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तमिळनाडूमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यातील द्रमुक आणि अद्रमुक या दोन्ही प्रमुख पक्षांचे अनेक दिग्गज नेतेमंडळी  प्रचारासाठी मैदानात उतरलेत. अशातच आज द्रमुकचे नेते दिंडिगल लिओनी यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह्य विधान केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लिओनी यांच्या भाषणाच्या क्लिपमध्ये ते, “परदेशी गायींचं दूध प्यायल्यामुळेच आपल्याकडच्या महिलांनी फिगर गमावली असून त्या जाड झाल्या आहेत” असं विधान करताना दिसतायेत. तत्पूर्वी, पश्चिम बंगालमध्ये देखील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी “ममता दीदींनी साडीऐवजी बर्मुडा घालावा, म्हणजे त्यांचा पाय व्यवस्थित दिसेल”, असं वादग्रस्त विधान केलं होत.

दरम्यान, लिओनी यांनी तोडलेले अकलेचे तारे व्हायरल झाल्यानंतर पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कनिमोळी यांच्याकडे लिओनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

नेमकं काय म्हणाले दिंडिगल लिओनी?

“तुम्हाला माहिती आहे का, की अनेक प्रकारच्या गायी असतात. शेतामध्ये तुम्हाला हल्ली परदेशी प्रजातीच्या गायी दिसतील. लोकं या गायींसाठी दूध काढायचं मशिन वापरतात. दिवसाला ४० लिटर दूध मिळतं. ते दूध प्यायल्यामुळे आपल्या सगळ्या महिला फुग्याप्रमाणे जाड झाल्या आहेत. आधी महिलांची फिगर (इंग्रजीतल्या) आठ आकड्यासारखी होती. मुलांना त्या कंबरेवर ठेवत असतं. पण आता जर त्यांनी मुलांना तसं ठेवलं, तर मुलं देखील घसरून पडतील. कारण महिला आता बॅरलसारख्या झाल्या आहेत. आपली सगळी मुलं देखील जाड झाली आहेत”, असं लिओनी म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.