Pune Crime: बाॅडी बनवण्याच्या इंजेक्शनची बेकायदेशील विक्री करणारे जेरबंद

पुणे – शरीरयष्टी वाढविण्याकरिता डाॅक्टरांचे प्रिस्क्रीप्शन द्वारेच विक्री करणे बंधनकारक असलेले मेफनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन अवैधरित्या जवळ बाळगून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या चार आराेपींना बिबवेवाडी पाेलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पाेलीसांनी २११ इजेक्शन औषधाचे बाॅटल्स, एक स्विफ्ट कार असा एकूण दाेन लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ पाचच्या पाेलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे.

याप्रकरणी परेश निवृत्ती रेणुसे (वय-३३,रा.धनकवडी,पुणे), प्रविणसिंग पुकसिंग भाटी (२३,रा.शिवणे,पुणे), अक्षय संभाजी वांजळे (२६,रा.वारजे, पुणे) व शाैनक प्रकाश संकपाळ (२८,रा.बहिरटवाडी,पुणे) या चार आराेपींना अटक करण्यात आली आहे.

बिबवेवाडी पाेलीस ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पीएसआय संजय आदलिंंग पेट्राेलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, एक इसम डाॅक्टरांचे प्रिस्क्रीप्शन शिवाय शरीरयष्टी वाढविण्याकरिता इंजेक्शनची विक्री करण्यासाठी बिबवेवाडी येथील डाॅल्फीन चाैकात येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनिल झावरे यांचे मार्गदर्शनाखाली पाेलीस पथकाने आराेपी परेश रेणुसे यास सापळा रचून अटक केली.

त्याच्या ताब्यातून इंजेक्शनचे सहा बाॅटल हस्तगत करण्यात आले. त्यानंतर त्याचेकडे अधिक चाैकशी करुन त्याचा साथीदाराकडून तसेच त्यांचे घरझडतीत एकूण २११ बाॅटल्स व एक कार मिळून आली. याबाबत अन्न औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक अतिश सरकाळे यांनी बिबवेवाडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास बिबवेवाडी पाेलीस करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.