Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपी 24 तासाच्या आत ‘जेरबंद’; सहकारनगर पोलिसांची कारवाई

पुणे – खुनाच्या प्रयत्नातील आरोपींस सहकारनगर पोलीसांनी 24 तासाच्या आत जेरबंद केले. गुन्हा केल्यानंतर ते तावरे कॉलनी येथे लपून बसले होते. सहकारनगर पोलीस स्टेशन येथे कलावती शिवाजी कांबळे, (50, रा. गल्ली नं., तळजाई वसाहत ) यांनी दि.23 सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता.

यातील जखमी आतिश शिवाजी कांबळे (27 रा. गल्ली नं., तळजाई वसाहत ) हा धनकवडी
येथे गॅरेजवर काम करीत असताना त्यास साहिल बळीराम पाटोळे (20 रा. तळजाई वसाहत) त्याचे साथिदार संकेत चव्हाण व अमोल पवार ( रा.तळजाई वसाहत ) यांनी धारदार हत्याराने मानेवर व हातावर वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणाचा तपास करणारे पोलीस उप-निरीक्षक सुधीर घाडगे व अंमलदार करत असताना पोलीस अंमलदार सागर शिंदे व प्रदिप बेडीस्कर यांना सदर आरोपी हे तावरे कॉलनी येथे लपुन बसले असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार आरोपींना तावरे कॉलनी येथे स्टाफसह जावुन सापळा रचुन पकडण्यात आले. अटक आरोपीकडुन गुन्हयात वापरलेला लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक युनुस मुलानी यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापु खुटवड, पोलीस नाईक महादेव नाळे, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, पोलीस शिपाई महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर, सागर सुतकर व शिवलाल शिंदे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.