महंत नरेंद्र गिरी हत्ये प्रकरणी शिष्याचीच चर्चा जास्त! कोण आहे आनंद गिरी, पीएच. डी ते योगगुरूचा प्रवास कसा झाला?

उत्तर प्रदेशात गाजत असलेल्या प्रयागराज मधील बाघंबरी मठाचे प्रमुख महंत और अखाड़ा परिषद के अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या हत्येमागील प्रमुख सूत्रधार त्यांचा शिष्य आनंद गिरी असल्याचे समोर आल्यावर त्याच्याबद्दल सगळीकडे चर्चा सुरु झालेली आहे. अतिशय हुशार आणि सर्वांवर प्रभाव टाकण्याची क्षमता यामुळे पीएच.डी. परदेशात दौरे, योग प्रशिक्षक म्हणून प्रसिद्धी असे त्याचे वलयांकित व्यक्तिमत्व असल्याची बाब पुढे आली आहे. 

महंत नरेंद्र गिरी यांची हत्या होण्याआधी 20 सप्टेंबर रोजी 18 लोकांशी दूरध्वनीवर बातचीत केली होती. त्यामध्ये हरिद्वारमधील दोघा प्रॉपर्टी डीलरचा समावेश आहे. त्यांच्या फोनमधील डायल केलेल्या क्रमांकाच्या यादीत 35 क्रमांक आहेत परंतु, त्यातील 18 जणांशीच त्यांचे बोलणे झाले होते. त्याच्या मृत्यूच्या दिवशी त्यांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्ती आता चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. 

विशेष म्हणजे हरिद्वारमधील ते दोन प्रॉपर्टी डीलर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्या चौकशीतून महंत आणि त्यांच्यामध्ये काय बोलणे झाले होते हे पुढे येण्याची शक्यता आहे. महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येच्या आधी लिहिलेल्या चिठ्ठीत असे म्हटले आहे की, ते 13 सप्टेंबरलाच आत्महत्या करणार होते पण, त्यादिवशी त्यांच्याकडून ते धाडस झाले नाही. त्यामुळे कथित व्हिडिओप्रकरणाची माहिती त्यांना 13 सप्टेंबरपूर्वीच झालेली होती हे स्पष्ट होत आहे.

महंत नरेंद्र गिरी यांना पोलिसांची सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेत दिवसरात्र तीन पोलिस असत. आता त्यांचीही चौकशी होणार आहे. नरेंद्र गिरी यांचा मृतदेह मठात सापडला तेव्हा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील कोणताही पोलिस तिथे नव्हता. घटना घडली तेव्हा ते सर्व पोलिस कुठे होते याबद्दलचे लोकेशन मागवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेतील अजयसिंह हा पोलिस गेली अनेक वर्षे त्यांच्या सुरक्षेत होता. त्याशिवाय आणखी पाच पोलिस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. 

नरेंद्र गिरी यांच्या हत्येमागील प्रमुख आरोपी त्यांचा शिष्य आनंद गिरी याने अजयसिंहवर आरोप केला आहे की, त्याने नरेंद्र गिरी यांच्याशी असणाऱ्या जवळीकीचा फायदा घेऊन कोट्यावधींची संपत्ती जमवलेली आहे. आनंद गिरीने आणखी दोन पोलिसांचीही या प्रकरणात नावे घेतलेली आहेत. महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येची बातमी कळल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले तेव्हा त्यांच्या सुरक्षेतील एकही पोलिस त्याठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखीन वाढले आहे.

महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी याला आत्महत्येबद्दल जबाबदार ठरवले आहे. सध्या आनंद गिरी आणि निद्रीस्त हनुमान मंदिराचा मुख्य पुजारी आद्याप्रसाद तिवारी पोलिस कोठडीत आहेत. आनंद गिरी हा मूळचा राजस्थानमधील भीलावाडा जिल्ह्यातील सरेरी गावातील आहे. त्याचे मूळचे नाव अशोक चोटिया असे आहे. सातवीत असताना तो कुणालाही न सांगता घरातून निघून गेला होता आणि बारा वर्षानंतर आनंद गिरी बनून परत आला. 

आता त्याचे नाव नरेंद्र गिरी हत्या प्रकरणात आल्यानंतर त्याचे कुटुंबिय आणि लहानपणीचे मित्र चकीत झाले आहेत. विशेष म्हणजे आनंद गिरीकडे योग प्रशिक्षणातील पीएच. डी. पदवी आहे. त्यामुळे योग गुरु अशीही त्याची ओळख आहे. त्याखेरीज त्याला 15 पेक्षा अधिक भाषांचे ज्ञान असल्याचे सांगितले जाते. योग प्रशिक्षणासाठी आनंद गिरी याने अमेरिका, ब्रिटन, युरोप, तुर्कस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशांचा दौरा केलेला आहे. 

2013 मध्ये त्याने स्वर्णभूमी प्रयाग या नावाचे पुस्तकही लिहिले होते. अनेक विद्यापीठांमध्ये तो योग प्रशिक्षक म्हणून जात असतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.