पुणे – शहरात मागील चोवीस तासांत 185 करोना बाधित रुग्ण आढळले असून, बरे झालेल्या 237 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यातील पाच जणांसह 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरात सध्या 2 हजार 391 सक्रिय बाधित रुग्ण असून, त्यापैकी 206 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 360 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 4 लाख 88 हजार 478 जणांना करोनाची लागण झाली असून, त्यापैकी 4 लाख 77 हजार 285 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8 हजार 802 बाधितांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. चोवीस तासांत 9 हजार 766 संशयितांची करोना टेस्ट करण्यात आली आहे.