पुणे –करोना बाधित मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून, ते शून्यावर येण्याचे प्रमाणही कायम आहे. आजपर्यंत जवळपास सहा वेळा ही सुस्थिती स्थिर आहे. शुक्रवारीही शहरात शून्य मुत्यूची नोंद झाली तर शहर हद्दीबाहेर एकाचा मृत्यू झाला.
त्याचबरोबर शहरात 57 नव्या बाधितांची नोंद झाली असून, त्याच्या जवळपास दुप्पट म्हणजे 110 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच दिवसभरात 5 हजार 493 संशयितांच्या स्वॅबटेस्ट झाल्या आहेत.
करोना बधितांबरोबर सक्रीय बाधितांची संख्या 800 पेक्षा कमी झाली असून, सध्या ती 792 झाली आहे. यातील 135 जणांची प्रकृती गंभीर असून, 109 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांतील बाधितांचा समावेश करून पाच लाख चार हजार 156 एवढी आजपर्यंत बाधित संख्या झाली असून, 4 लाख 94 हजार 290 एवढे बाधित बरे झाले आहेत