पुणे –दिवसभरात 256 नव्या बाधितांची नोंद झाली असून, 12 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 5 जण पुण्याबाहेरील आहेत. गेल्या चोवीस तासांत 6 हजार 617 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली असून, त्यांचा समावेश करून आजपर्यंत 28 लाख 87 हजार 906 जणांची स्वॅबटेस्ट झाली आहे.
त्यातील 4 लाख 87 हजार 421 जण बाधित आढळले असून, त्यातील 4 लाख 76 हजार 235 जण बरे झाले आहेत. मात्र सध्या बाधित असलेल्यांपैकी 2 हजार 412 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 221 जणांची प्रकृती गंभीर आहे तर 341 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 333 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच 12 मृतांमधील शहरातील सात जणांचा समावेश करून आजपर्यंत 8 हजार 774 जण मरण पावले आहेत.