औंध( प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांच्या विरोधात रविवारी (दि.11 डिसेंबर) राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी तर्फे जीवन चाकणकर, सतीश रणवरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ बाणेर येथील बालेवाडी फाटा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी सत्ताधारी पक्षातील नेते मंडळींकडून होत असलेल्या बेताल वक्तव्यांचा उपस्थित कार्यकर्त्यांतर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी भगतसिंग कोशारी व चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना मानवी मूल्यांचा ऱ्हास चिंताजनक – राज्यपाल कोश्यारी
यावेळी पुणे शहर जिल्हा उपाध्यक्ष जीवन चाकणकर, वंचित बहुजन आघाडीचे सतीश रणवरे, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, दत्ताभाऊ जाधव , भाऊसाहेब चाकणकर, अर्जुन शिंदे, अर्जुन ननवरे ,प्राध्यापक देशमुख , सचिन भोसले, रंगनाथजी तामाने ,दयानंद चाकणकर, महेंद्र गंगावणे तसेच काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी घोषणा देऊन भगतसिंग कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांचा जोरदारपणे निषेध करण्यात आला.