मॉस्को – सर्वात घातक शस्त्राचे उत्पादन रशिया वाढवणार असल्याचे रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेडवेदेव यांनी म्हटले आहे. युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी हे नव्या जमान्यातील सर्वात घातक शस्त्र तयार केले जात आहे. नवीन तत्वांच्या आधारे विकसित केलेल्या या सर्वात घातक शस्त्रांचे उत्पादन रशिया वाढवणार आहे, असे मेडवेदेव यांनी टेलिग्राम ऍपवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रशियाचे शत्रुत्व केवळ किव्हपुरते मर्यादित नाही. युरोप, उत्तर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि नाझीवादाशी जवळीक असणारया सर्व शक्तींशी आमचे श6ुत्व आहे, असे मेडवेदेव म्हणाले. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख असलेल्या मेडवेदेव यांनी सर्वात घातक शस्त्राचा कोणताही तपशील दिला नाही.
रशियाचे ध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी वारंवार या घातक शस्त्राचे सूतोवाच केले होते. त्यामध्ये हायपरसोनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे सध्या असतित्वात असलेल्या सर्व क्षेपणास्त्रांना ते घेरू शकते, असे पुतीन यांनी म्हटले होते. या घातचक शस्त्राबाबत मेडवेदव नेहमीच सूचक पोस्ट करत राहिले आहेत.
सध्या रशियाच्या क्षेपणास्त्रांना युक्रेनकडून अत्याधुनिक ड्रोनने प्रत्युत्तर दिले जाते आहे. त्यातच पाश्चात्य तंत्रज्ञानाची जोड युक्रेनच्या शस्त्रांना मिळते आहे. त्यामुळे रशियाकडून या सर्वात घातक शस्त्राच्या वापराची शक्यता वाढली आहे.