पुणे – शहरात येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुणे शहर कुरेशी समाजातील मटण व चिकन विक्री दुकाने व सर्व व्यवहार बंद करून, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया कुरेशी जमियतुल कुरेश एक्शन कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी यांनी जाहीर केले आहे. आज कुरेशी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी सर्वानुमते हा निर्णय झाला असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.
२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या उत्साहाने होत असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद कुरेशी समाजास होत आहे. श्रीराम हे सर्वधर्मासाठी अत्यंत पूजनीय आहेत. अयोध्येमधील त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात आहे. यासाठी ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीच्या वतीने २२ जानेवारीला कुरेशी समाज आपले सर्व व्यवहार बंद करून या कार्यक्रमात आनंद व उत्साहाने सहभागी होत आहेत.
यावेळी सादिक कुरेशी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ,हसन अब्बास कुरेशी अध्यक्ष पुणे शहर, मेहमूदलाल कुरेशी सेक्रेटरी पुणे शहर, आरीफ बशीर कुरेशी उपाध्यक्ष पुणे शहर,वाहिद मजिद कुरेशी ज. सेक्रेटरी पुणे शहर,नियाज अहमद कुरेशी ज. सेक्रेटरी पुणे शहर, अकबर हनीफ पटेल कार्याध्यक्ष पुणे शहर, हाजी नासिर कुरेशी सल्लागार, हाजी शादाब कुरेशी हाजी शरीफ कुरेशी यासह या प्रसंगी पुणे शहरातील कुरेशी समाजाचे प्रमुख मान्यवर व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.