पुणे -करोनाच्या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळावा, यासाठी त्याचा पुरेसा पुरवठाही गरजेचा आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचा विचार पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड करत आहे. यासंबंधी संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयात दररोज 200 च्या आसपास ऑक्सिजनची गरज भासते. खडकी कॅन्टोन्मेंटने ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबत संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्याच धर्तीवर पुणे कॅन्टोन्मेंटमध्येही ऑक्सिजन प्लांट असावा, अशी माहिती पटेल रुग्णालयाच्या अतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा तापसे यांनी दिली.
रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही दररोज करण्यात येत आहे. वेळप्रसंगी बाहेरूनही मागविण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना सध्या ऑक्सिजन सिलिंडर आणण्याच्या व्यवस्थेला लावले आहे. एकूण चार टीम तयार करण्यात आल्या आहेत.