विवेकानंद काटमोरे
हडपसर – भारतीय जनता पक्षाच्यावतीने महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा तसेच आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्यात अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहर अध्यक्ष धीरज घाटे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नामदेव माळवदे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश पिंगळे, माजी आमदार योगेश टिळेकर, विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, संघटन सरचिटणीस गणेश घुले, विधानसभा अध्यक्ष अनिल येवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचीतांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
हडपसर येथील ससाणेनगरच्या स्मिता गायकवाड यांच्या कार्याची दखल घेत शहर भाजपा ओ.बी.सी. आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मांजरी बुद्रुक येथील विद्याधर भोसले यांच्यावर एससी-एसटी आघाडीच्या हडपसर मंडल सरचिटणीस पदाची अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सोनल कोद्रे यांच्या कामाची दखल पक्षवरिष्ठांनी घेतली असून त्यांना भाजपा महिला आघाडीच्या संघटक पदी नियुक्त करण्यात आले आहे. सोनल कोद्रे या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी यांनी ही नियुक्ती केली आहे. तसेच, कोंढवा येथील दत्तात्रय बारवकर यांची भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा ओबीसी मोर्चाचे माजी सरचिटणीस नितीन होले यांच्यावर अतिशय महत्त्वपूर्ण समजली जाणारी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपने केलेल्या महत्त्वपूर्ण निवडीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी शोभा रोहिदास लगड यांना नियुक्त करण्यात आले आहे.
याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या (पूर्व) ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्षपदाची धुरा आता प्रकाश फुलारे सांभाळणार आहेत. पक्षाच्या मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप दळवी यांनी ही नियुक्ती केली आहे. मांजरी येथील तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांचे कार्य विचारात घेता भाजपाच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तरी, संतोष शिंदे यांची भाजपा हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.