औंध -बाणेर-बालेवाडी भागात समान पाणी योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रान्समिशन जलवाहिन्यांची कामे काही भागात अपूर्ण अवस्थेत आहेत ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेस दिले आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या कामाच्या सद्यस्थितीची माहिती पालकमंत्री पाटील यांना पत्राद्वारे कळविली होती, त्याची गंभीर दखल घेत महापालिकेस याबाबत आदेश पालकमंत्री पाटील यांनी देण्यात आले आहेत.
बाणेर-बालेवाडी-पाषाण भागामध्ये समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील 8 पैकी 6 पाणी टाक्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्या देखील सुरू करण्यात येतील. परंतु, या टाक्यांना ट्रान्समिशन लाइनमधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या लाइनचे काम आपण केलेल्या सूचनेनुसार पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. वारजे ते बाणेर-बालेवाडी पर्यंतच्या भागामध्ये या ट्रान्स्मिशन लाईनचे काम अनेक ठिका अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. तसेच, या पाणी टाक्यांच्या अंतिम टप्प्यामधील काही कामे देखील प्रलंबित आहेत. या कामांबाबत आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती, त्यानुसार सदर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याकरिता तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहेत.
ही कामे प्रलंबित…
डुक्कर खिंड वारजे महामार्ग परवानगीसाठी 250 मीटर जलवाहीनीचे काम
वारजे येथे 36 मीटर जलवाहीनीचे काम
चांदणी चौक येथे एका खासगी जागेतून जाणाऱ्या 60 मीटर काम
एचइएमआरएल रामनदीवरील स्ट्रक्चरल स्टील ब्रीजमुळे ट्रान्समिशन लाइन
पाषाण तलाव येथ स्ट्रक्चरल स्टील ब्रीज 40 मीटर काम
सुस खिंड ते कुमार पेपीलोन सोसायटी पर्यंतचे सुमारे 800 काम
सुतारवाडी गावठाण येथे सुमारे 150 मीटरचे काम
सुस खिंड पूल ते किया शोरूम, बालेवाडी डेपो पर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम