भरती प्रक्रियेतील पेपर फुटीप्रकरण स्वत:कडे घेण्याची लष्कर प्रशासनाची तयारी नाही : सरकारी पक्ष
पुणे – लष्कर भरती प्रकरणात आठ जणांचा जामीन विशेष न्यायाधीश एस.बे.हेडाऊ यांनी फेटाळला. त्यामध्ये दोन मेजर आणि ऍकडमी चालकांचा समावेश आहे.
दरम्यान, केस स्वत:कडे घेण्यास लष्कराने असमर्थता दर्शवली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी दिली आहे. मेजर किशोर गिरी, माधव गिते, गोपाळ कोळी, उदय औटी, भारत अडकमोळ, मेजर थिरू थंगवेलू, वसंत किलारी, विरा प्रसाद नारगेपाटी अशी जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत.