पुणे – अल्पवयीन मुलाचा टोच्याच्या सहाय्याने खूनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पर्वती पोलिसांनी अटक केली. जखमी मुलगा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.अरुण रोहिदास चंदनशिवे (47, धायरी), अशोक रोहिदास चंदनशिवे (48, धायरी ), विकी कुमार चंदनशिवे ऊर्फ राज (32, धायरी ), कुणाल कृष्णा सावंत (24,नऱ्हे ) आणि प्रतिक ऊर्फ रणजित उत्तम कांबळे (32, रा.पर्वती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अरुण व अशोक यांच्यावर खून आणि खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एका 17 वर्षाच्या मुलावर पाच ऑगस्ट रोजी बर्फाचा टोच्या आणि धारदार हत्याराने वार करुन खूनाचा प्रयत्न करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सुनिल जगदाळे पथकासह आरोपींच्या मागावर होते. दरम्यान पोलीस हवालदार कुंदन शिंदे , पोलीस अंमलदार सद्दाम शेख, प्रकाश मरगजे यांना आरोपी हे लक्ष्मीनारायण टॉकिज शेजारील उड्डान पुलाखाली पर्वतीदर्शन येथील सार्वजनिक पर्किंगमध्ये पळुन जाण्याच्या तयारीत थांबल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आले.
…म्हणून केला खूनाचा प्रयत्न
फिर्यादी मुलाच्या मामाचा दहा वर्षापुर्वी खून झाला होता. तेव्हा फिर्यादी सात वर्षाच्या होता. त्याच्या मामाच्या खुनातुन अशोक व अरुण चंदनशिवे यांची 6 वर्षापुर्वी निर्दोष सुटका झाली होती. याचा राग येवुन अल्पवयीन फिर्यादी हा आरोपीच्या नातेवाईकांना त्रास देत होता. याचा राग आल्याने आरोपींनी कट रचत अल्पवयीन मुलाच्या खूनाचा प्रयत्न केला असल्याचा संशय आल्याने त्या रागातून आरोपींनी सदर गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा तपास केला जात आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, उप-आयुक्त सुहैल शर्मा, सहायक आयुक्त आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनिल जगदाळे, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे- पाटील, नवनाथ भोसलेप्रमोद भोसले, प्रशांत शिंदे, अनिस तांबोळी, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अमित चिव्हे, व अमोल दबडे यांनी केली आहे.