पुणे – चालकाचं नियंत्रण सुटल्याने पुण्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना धडक दिली असून नवले ब्रीजवर पुणे-बंगळुरु महामार्गावर हा अपघात झाला. यामध्ये सहा ते सात जण जखमी झाले आहेत. ( accident near Navale Bridge )
प्राप्त माहितीनुसार, चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रकने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ट्र्क साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने निघाला असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या व रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या वाहनांना ट्रकने धडक दिली. या अपघातामुळे काही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. ( accident near Navale Bridge )
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही वेळासाठी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.